आजचा विचार




आजचा विचार
काळजातला ओलावा तुमच्या दिसण्यावर नाही तर असण्यावर अवलंबून असतो. तुम्ही जसे दिसता तसे असताच असं नाही आपण जसे असता तसे दिसताच असंही नाही. आतले तु
म्ही आणि तुमचं बाह्यरूप खूप वेगळं असतं, असू शकतं. कवीवर्य सुरेश भटांचंच बघा ना. गडी एकदम रांगडा, पाहाताक्षणीच दडपण यावं असा. ऐसपैस पसरलेला अवाढव्य देह, खाण्यापिण्याच्या सवयीही तशाच. पण त्यांच्या शब्दांनी मराठीत जो प्राजक्ताचा सडा टाकला त्याला तोडच नाही. जणू काळजातल्या कुपीतून मोरपिसा-याच्या कुंचल्यानं लिहिलेला एकेक शब्द. त्यातही किती वैविध्य ! नवथर प्रेमिकांच्या हळव्या शब्दापासून ते गोकुळातल्या कृष्णलीलांपर्तंत आणि सडतोड गझलांपासून भाषेचं मोठेपण सांगण्यापर्यंत !  पहिला अनभुव घेणा-या नवथर तरुणीच्या अलवार भावना
'मेंदिच्या पानावर' चितारल्या तर पहाटेच्या थंडगार वा-यात घनतमी शुक्र असताना 'मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे' असं आर्जव करणारी त्यांची सखी प्रत्येक जीवाला आपली वाटली. अशा भावनांना शब्द देणारे भट
आणि त्यांची प्रतिमा यांचा मेळ बसतो ? तसंच आपलंही. काळजातला आपलेपणा तुमच्या दिसण्यावर अवलंबून नसतो.तुमच्यात तो मुळातच असावा लागतो. हा झरा सतत आणि शेवटपर्यंत वाहता असला की भवताली माणसांची
मांदियाळी जमतेच. त्यासाठीच हवं असतं जिंदादिल मन !
सदानंद.९४२०७९१६८०




No comments:

Post a Comment