[7/3, 8:41 AM] चंद्रकांत काशिनाथ निकाडे: 🙏🏼🙏🏼🙏🏼 *सलाम देवमाणसाला*🙏🏼🙏🏼🙏🏼
कालचा रविवार
वेळ सकाळी सातची
पोहाळे येथील स्टँडवर
एक गृहस्थ आले
त्यांच्या सोबत आणलेल्या
दुचाकीवरील पंक्चर काढण्यासाठी सर्व साहित्य
खाली उतरले
ATM समोर लावलेल्या एका दुचाकीचे मागील चाकाचे पंक्चर काढले
आपले साहित्य जमा करून जाऊ लागले इतक्यात पंक्चर झालेल्या गाडीचे मालक जोतिबा देवाचे दर्शन घेऊन खाली आले
आपल्या गाडीचे पंक्चर काढलेले पाहून त्यांना खूप आनंद झाला.
त्यांनी पटकन पँटच्या खिशात हात घातला व पन्नासच्या दोन नोटा काढून नम्रपणे पंक्चर काढणाऱ्या सद्गृहस्थाना देऊ केल्या.
ते सद्गृहस्थ त्यांच्याकडे पाहातच राहिले.
त्यांनी पैसे घ्यायला नकार दिला.
गाडी मालक ओशाळून म्हणाले, "घ्या की राव, कमी वाटतात काय? पण माझ्याकडे आता एवढेच आहेत."
ते सद्गृहस्थ म्हणाले,"माऊली आज रविवार. जोतिबा यात्रेकरुंसाठी मोफत पंक्चर सेवा."
इतके मोजके बोलून नमस्कार करून त्यांनी मागे न पाहता गाडीला किक मारली.
त्या गाडी पंक्चर झालेल्या यात्रेकरूंचे डोळे भरून आले.
"असं कुठं असतं का! काम करायचं, अडचणीत मदत करायची आणि मोबदलाही घ्यायचा नाही."
पण त्यांचे हे उद्गार ऎकायला हजर होते कोण?
आम्ही सकाळी फिरायला जाणारे दोन चार लोक.
अधिक चौकशी करता समजले की,
भुयेवाडी ता.करवीर येथे राहणारे *कृष्णात नारायण पाटील* हेच ते सद्गृहस्थ.
गेली अनेक वर्षे केवळ फोन करून गाडीचा नंबर व ठिकाण सांगितले की, परिसरातील १५/२० किमी परिघ अंतरावर जागेवर जाऊन किमान मोबदल्यात पंक्चर काढून देतात.
अगदी दोन चार प्रकारच्या ट्यूब्ज ही सोबत घेऊन येतात.
आणि रविवारी यात्रेकरूंना तर ही सेवा पूर्णपणे मोफत.
💐💐💐💐🙏🏼💐💐💐💐
तेव्हा जोतिबा परिसरात असा प्रसंग गुदरला तर गडबडून जाऊ नका. *9765654369* या नंबरला फक्त काॅल करा. आणि भेटा या देवमाणसाला.
💐💐💐💐💐💐💐💐
माणसांतील या देवत्वाला लाख सलाम🙏🏼... ... ...
[7/4, 7:42 PM] चंद्रकांत काशिनाथ निकाडे: परवाच
एका बंधूंनी एका प्रवचणकाराला प्रश्न विचारणाऱ्या मुलीचा व्हिडिओ पाठवला होता.
प्रतिक्रिया द्या असे म्हणाले होते.
तरीही बाब धार्मिक असल्याने
विचारपूर्वक लिहिले पाहिजे.
चार दिवस वाट पाहिली.
कोणीही प्रतिक्रिया दिली नाही.
याचा *एक* अर्थ
क्लिप पाहिली नसावी.
*दुसरा* अर्थ
पाहिली, प्रवचणकाराचे विचार पटले. म्हणून बोलणे/लिहिणे आवश्यक वाटले नाही.
*तिसरा* अर्थ
पाहिली, प्रवचणकाराचे विचार पटले नाही पण त्या मुलीचे विचार योग्य होते हे बोलण्याचे धाडस झाले नाही.
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
माझे विचार... ... ...
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
१)त्या मुलीने चांगले (विचारांती) प्रश्न विचारले होते.
२)प्रवचणकारांनी मात्र त्या विचारांचे योग्य समाधानकारक उत्तर दिले नाही.
३)प्रवचणकारांची भावमुद्रा अतिशय गंभीर तर होतीच पण जितक्या सहजतेने त्या मुलीशी बोलायला हवे होते ते त्यास जमले नाही.
*४)देवाला वस्तू अर्पण केली असता ती पवित्र होते. या त्याच्या उत्तरातच समजते की अर्थातच अर्पण करण्यापूर्वी ती वस्तू अपवित्र होती.*
५)दूध, तेल, तूप याची नासाडी तर होतेच. पण कष्टाने मिळविलेल्या एका पैशाचाही विनियोग कष्टकरी विचारपूर्वक करतो.
६) प्रवचणकाराच्या बोलण्याचा आणखी एक अर्थ असा होतो की ज्यांच्याकडे अपवित्र धन-संपत्ती आहे त्यांनी ती तथाकथित देवांना अर्पण करावी म्हणजे *ती पवित्र* होते.
७) कोणत्या देव व सत्पुरुषाने भक्तांनी अर्पण केलेल्या वस्तूचा भोग स्वता घेतला आहे ?
८)देवधर्माच्या नावाखाली भावनिक दडपणाखाली लुटण्याचेच काम चालेले असते.
९)म्हणूनच *पापी आत्मा भित्रा असतो* हे विवेकानंदांचे वचन पटते.
१०) देवा,देवऋषांना धन अर्पण करणारे ठगांचे वैभव पाहून कष्टकऱ्यांना वाटते, देवाला हे लोक काही अर्पण करतात म्हणून समृद्ध आहेत. तो त्यांची भाबडेपणाने नक्कल करतो. आणि लुबाडला जातो.
११) देव असलाच तर तो
*दगड,माती,लाकूड अशा निर्जीव वस्तूचे ठिकाणी नाही.* तो सजीवांच्या ठायी असावा.
म्हणून *जनसेवा हीच ईश्वर सेवा* हे वचन योग्य वाटते.
आणि सर्वांत. महत्वाचे भक्तीत एजंट कशाला.
१२) त्या मुलीने आपली बाजू मांडताना म्हटले *"वस्तू अर्पण करायला, देव भिकारी आहे का?"* तिचे विचार अत्युत्तम होते. ते दबाव तंत्राने खोडण्यात आले.
असो,
चिकित्सा करावी !
कार्यकारणभाव शोधावा !!
अंधभक्ती व अंधविश्वास घातकच असतात!!!
अाणि त्यास बळी पडलेल्यांना फार उशिरा हे समजते.
*धन्यवाद*
No comments:
Post a Comment