Sunday, 17 September 2017

Mother

माय

टिळा कुंकवाचा माय रोज लेते कपाळास
घरधन्याचे आयुष्य वाढू देरे हीच आस

आयन्यात न्याहाळून तेज रेखे सूरव्याचे
मेण घट्ट चिकटते गळा सूर मारव्याचे

फुलविते बोटानेच मन भरून रंगात
ठेवी सिंदूर आपल्या हलकेच ती भांगात

सात जन्माची सोबत आहे तिला सुद्धा हवी
दळताना कांडताना गाते भ्रताराची ओवी

अशी माय आठवते आणि तिची ती पुण्याई
कर्ज घेतल्या दुधाचे सांग कसे फेडू आई .

*रमेश कुरलीकर*

No comments:

Post a Comment