Tuesday, 13 February 2018

Suresh Benade

"चंद्रकांत निकाडे सर आणि सायकल  "                    आमच्या पोहाळेच्या नवनाथ हायस्कूलमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून मुख्याध्यापक म्हणून काम करत  असलेले व गावातील विद्यार्थींच्यी एक पिढी घडवलेले एक विलक्षण अभ्यासू  व्यक्तीमत्व म्हणजे ' सर '.  वास्तविक मी पण त्यांचाच एक विद्यार्थी साधारण  1998 ते 2001 ह्या काळात मी  हायस्कूल मध्ये शिकत असताताना ते आम्हास हिंदी विषय शिकवायचे त्या वेळेस व आत्ता सुधा शाळकरी मुलांमध्ये त्यांच्याविषयी आदर युक्त भिती असते. त्यांच्या व्यासंगी स्वभावामुळे ते नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत राहून नव- नवीन प्रयोग करीत असतात. हल्ली  त्यांच्या व आमच्याही   व्यस्त दिनक्रमामुळे त्यांचा फारसा  सहवास लाभत नाही. त्यांच्याकडे असलेला प्रचंड  उत्साह व धडपड पाहून आम्हाला त्याच अप्रूप वाटत. गेल्या कित्येक वर्षांपासून ते दररोज  पहाटेच्या वेळी मॉर्निंग वाॅकला जातात मीही तसा मॉर्निंग वाॅकचा प्रयोग करून पाहिला पण मला  ते काय जमले नाही. अलीकडेच त्यांनी एक लघुपट तयार केला त्याच्या प्रिमियर शो साठी मीही शाहू स्मारक येथे गेलो होतो , लघुपट  छान होता.  सरांची सगळ्यात चांगली सवय  म्हणजे  ते  गेल्या कित्येक वर्षांपासून  शाळेत किंवा शेतात  किंवा  जवळपास  प्रवास करताना   शक्य त्या ठिकाणी   नेहमी सायकल वापरतात,  परवाच त्यांनी एक नवीन सायकल खरेदी केली आहे अस समजल  ते नेहमीच  पर्यावरण संवर्धनासाठी कृतिशील प्रयत्न करीत आसतात त्याच आपण अनुकरण करायला हवे अस मला मनापासून वाटत व आपणही एखादी नवीन सायकल खरेदी करावी असा विचार मी सध्या करीत आहे, व   शक्य त्या ठिकाणी सायकलचा वापर करावा अस वाटत  व असा प्रयोग मागे एकदा आमचे मित्र आदरणीय मा.सरपंच के. बी. पाटील यांनी देखील केला होता व त्याची बातमी आमचे मित्र पत्रकार  श्री. निवासराव मोटे यांनी पेपरमध्ये छापून आणली होती. वास्तविक सायकल वापराचे दुहेरी फायदे  आहेत एक तर यातून पर्यावरण संवर्धन तर होतेच सोबत शारीरिक व्यायाम होऊन आरोग्य सुध्धा चांगले राहण्यासाठी मदत होते. आता  सायकल वापराच्या चळवळीला आपण सगळ्यांनी कृतिशील पाठिंबा देण्याची आवश्यकता आहे. वाढत प्रदूषण, ग्लोबल वाॅरमिंगची समस्या,  लोकांना भेडसावणाऱ्या लठ्ठपणा, मधुमेह ह्यावर सायकलचा वापर एक उत्तम उपाय म्हणून   अलिकडे युरोपियन प्रगत देशात सायकलचा वापर वाढण्यासाठी सातत्याने प्रयत्न चालू आहेत त्याच आपण अनुकरण करण्याची आवश्यकता आहे. आपल्या गावातील शाळकरी मुलांना सायकल विषयी आवड निर्माण व्हावी म्हणून वरचेवर सायकल स्पर्धा आयोजित करता येण  आपल्याला शक्य  आहे तसेच  ज्यांना शक्य आहे त्यांनी सायकलचा  वापर करावा.  निकाडेसर व त्यांच्या सायकल  प्रेमाविषयी थोड लिहाव म्हणून हा छोटासा प्रयत्न.     -      सुरेश बेनाडे

No comments:

Post a Comment