*काव्यातील यमक...२*
कवितेत यमकामुळे गोडवा येतो, लय साधते, सौंदर्य वाढते. वाचनामुळे शब्दसंपदा वाढते. काही सन्मित्र म्हणतात की, 'यमक नसले तरी कविता बांधता येते.' हे मुक्तछंदात ठीक पण वृत्त व छंदयुक्त कवितेत यमकाशिवाय साज नाही.
यमक जुळवताना दमछाक होतेच कधीकधी.
त्यासाठी यमक अचूक साधता यावे म्हणून हव्या असणाऱ्या यमकासाठी सर्व पर्याय पाहून निवड करावी.
१) आस
कास
भास
खास
घास
डास
तास
दास
पास
फास
भास
मास
यास
रास
वास
२) आला
काला
घाला
चाला
झाला
नाला
पाला
बाला
भाला
माला
याला
लाला
... ... वाला
साला
३) कात
खात
गात
घात
जात
नात
तात
दात
पात
भात
मात
यात
रात
लाथ
वात
सात
ज्ञात
४) आज
काज
खाज
गाज
बाज
माज
राज
लाज
साज
हाक
वरील यमकांच्या जोड्या पाहिल्यास लक्षात येईल की,
क पासून सुरवात करून 'ज्ञ' पर्यंत भाषेत निश्चित अर्थ असणाऱ्या शब्दांची निवड केली आहे. अचूक यमक सुचत नसेल तर हा पर्याय बहुपयोगी ठरतो.
*देर पण दुरुस्त* या न्यायाने.
काही वेळा
क-ख,
---------------- चाक
---------------- लाख
ग-घ,
---------------- जागर
---------------- घागर
च-छ,
---------------- इच्छा
---------------- बच्चा
ज-झ,
---------------- माझी
---------------- ताजी
ट-ठ,
---------------- लाट
---------------- माठ
ड-ढ,
---------------- ओढ
---------------- सोड
न- ण,
---------------- सरून
---------------- करुण
त-थ,
---------------- पात
---------------- साथ
द-ध,
---------------- नगदी
---------------- अवधी
प-फ,
---------------- बाप
---------------- वाफ
ब-भ,
---------------- ताबा
---------------- गाभा
अशी तडजोड चालते. तसा प्रयत्न करायला, यमक वापरायला हरकत नाही. पण पर्याय नसेल तरच यांचा वापर करावा. कवितेच्या दृष्टीने अचूक यमक साधणे उत्तमच.
ऱ्हस्व-दीर्घ याबाबतही काही गैरसमज असतो. त्याबाबतीत कवींना सवलत असते असे समजून लेखन दामटले जाते.
ऱ्हस्व-दीर्घ याबाबतीतली सवलत वृत्तातील लगावली साधण्यासाठी करावी;/केली जाते. मात्र अशावेळी अनर्थ होणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा कवितेचा आशय बदलून जाण्याची शक्यता अधिक असते. *'अमुक कवीने तमुक ठिकाणी असे लिहिले आहे म्हणून मीही लिहिले.'* ही झाली पळवाट. त्यांनी तसे का केले आहे ? त्या प्रयोगाने निर्दोष काव्यनिर्मिती झाली का ? याची खात्री वा शहानिशा करूनच आपणही आवश्यक तेथेच ऱ्हस्व-दुर्गाचे स्वातंत्र्य उपभोगाचे.
नवोदितांनी पूर्ण अभ्यासानंतरच वृत्ताकडे वळावे. त्यासाठी बाजारात मुद्रित स्वरूपात काव्यशास्त्रावरील विवेचन करणारी जाणत्यांची, जेष्ठांची, अभ्यासकांची पुस्तके मिळतात. योग्य ठिकाणी मागणी/विचारणा केल्यास उपलब्ध होतात. ई-बुक प्रकारातही मिळतात किंवा 'पीडीएफ' स्वरूपातही उपलब्ध होतात.
No comments:
Post a Comment