.... *अभिरूप न्यायालय*
विद्यार्थ्यांना न्यायालयीन कामकाजाची तोंडओळख व्हावी म्हणून दि.२०/९/१८ रोजी नवनाथ हायस्कूल, पोहाळे येथे *अभिरूप न्यायालय* हा उपक्रम घेण्यात आला.
या उपक्रमात एक प्रमुख न्यायाधीश व दोन सहन्यायाधीशांची निवड मुलामधून मुलांनी केली.
*"दहावीची मुले वर्गात कचरा करतात."* अशी फिर्याद मुख्याध्यापकांनी पुराव्यासह न्यायालयासमोर मांडली.
या खटल्यात दहावीचे वर्गप्रतिनिधींना आरोपी करण्यास आले होते. याच खटल्यांतर्गत 'च्युईंगगम खाणाऱ्या तीन मुलांची तक्रार फिर्यादीनी दिली होती.
न्यायाधीशांनी संविधानाची शपथ घेऊन कामकाजास सुरवात केली.
आरोपींना समोर बोलावून आपले म्हणणे नीट मांडण्यासाठी आरोपींना वकील नेमण्याची मुभा न्यायाधीशांनी दिली. मात्र आरोपींनी वकील न नेमता स्वत:च आपली बाजू मांडत गुन्हा कबूल केला. सह आरोपींच्या गुन्ह्यासाठी साक्ष म्हणून वर्ग सफाई करणारे सेवक व ज्यांनी कचरा करणारे विद्यार्थी पाहिले होते अशा शिक्षकांनाच उभे केले.
या सर्वांच्या जबाबानंतर फिर्यादी मुख्याध्यापक यांनी सर्वांची उलट तपासणी घेतली.
वादी-प्रतिवादींचे जबाबानंतर न्यायाधीशांनी आपसात मसलत करून पुढील न्यायदान केले.
१) दहावीची मुले वर्गात कचरा करतात हा आरोप खरा असून पुराव्यासह तो सिद्ध झाला आहे. आरोपींनीही गुन्हा कबूल केला आहे. मुख्य आरोपींसह वर्गातील सर्व मुले जबाबदार असल्यामुळे व ही पहिलीच वेळ असल्यामुळे सर्वांना समज देणेत यावी व पुन्हा असा गुन्हा घडल्यास कडक शासन दिले जाईल अशी लेखी सूचना द्यावी.
२) च्युईंग गम खाणारे अारोपी मुद्देमालासह सापडले, त्यासाठी त्यांना प्रत्येकी एक वर्गसफाई करण्याचे काम एक दिवस देणेत यावे.
*असे न्यायदान असले तरी पालकांना अनुरूप न्यायालयाची पूर्ण कल्पना दिल्याशिवाय व त्यांच्या संमतीशिवाय शिक्षेची अंमलबजावणी करू नये.* असे मुख्याध्यापकांनी शेवटी निवेदन केले व न्यायालयाचे कामकाज संपल्याचे घोषीत केले.
Tuesday, 25 September 2018
अभिरूप न्यायालय
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment