गझल परिचय - पार्श्वभूमी, दृष्टिकोन, तंत्र व आशय
Submitted by बेफ़िकीर on 14 December, 2010 - 05:45
या लेखाचा कोणताही भाग, हा लेख अथवा त्यातील मते इतरत्र कोठेही पूर्वपरवानगीशिवाय प्रकाशित करण्यास मनाई असून तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
काही मायबोलीसदस्य व मित्रांनी हुकूम दिल्यामुळे हा लेख येथे लिहीत आहे.
गझल कार्यशाळा व गझल परिचय यात फरक आहे. कार्यशाळेमध्ये तंत्राचा सराव करून घेतला जातो व काही वेळा लेखनातील सफाईचा! गझल परिचय यात गझलेबाबत एक दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न आहे व त्याबरोबरच संपूर्ण गझल तंत्र, मात्रा कशा मोजाव्यात, सुटी कोणत्या घ्याव्यात, विविध वृत्ते कोणती, ती कशी योजावीत हे सोदाहरण लिहीलेले आहे.
भटसाहेबांनी मराठीला दिलेल्या देणगीमध्ये, म्हणजे 'गझलेची बाराखडी'मध्ये अर्थातच मात्रा कशा मोजाव्यात, विविध वृत्ते कोणती हे दिलेले नाही कारण तो त्यांचा हेतूच नव्हता. मात्र मला गेल्या काही काळात असे लोक भेटले की जे गझलतंत्र तर समजलेले आहेत पण त्यांना वृत्त व मात्रा याबाबत अनेक शंका आहेत.
अनेक पुस्तकांमधील माहिती, अनेक जाणकारांची मते व मला वाटलेले काही मुद्दे असे एकत्र घोळवून हा लेख लिहीलेला आहे.
खरे तर हा लेख माझ्या गझलसंग्रहात, 'बेफिकीरी'मध्येच छापणार होतो. पण काही कारणाने ते रद्द झाले.
मी स्वतः गझल लिहायला 'सुरेश भट डॉट इन' या संकेतस्थळावर व तेथील जाणकारांकडून शिकलो. हा लेख लिहिण्याचा अधिकार माझ्याकडे आहे किंवा नाही हे मला माहीत नाही. मी बेधडक लिहीत आहे. मात्र इतके नक्की की हा लेख सर्व तांत्रिक शकांचे निरसन करू शकेल व गझलेबाबत एक दृष्टिकोनही देऊ शकेल.
माझ्या या लहानश्या प्रवासात अनेक मंडळींची मला मदत झाली. त्यांचे आभार!
Wednesday, 24 October 2018
गझल १
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment