मनोरंजन करण्यासाठी
अथवा मनोवृत्ती दाखविण्यासाठी
कधीकधी माणसे सैतानाचे
मुखवटे घालून
वावरत असत समाजात
आता
माणसाचा मुखवटा पांघरलेल्या सैतानांनी
आपल्याकडे दोस्तीसाठी
हात पुढे केले आहेत
सावधान !
घाईत देऊ नका
त्यांच्या हातात हात
किंवा म्हणू नका हो ला हो
काळ कठीण तर आहेच
पण गिधाडेही टपून आहेत
उशा-पायशाला
तुमच्या विचारांचा
खातमा करण्यासाठी
तेव्हा जपूनच पडू दे
प्रत्येक पाऊल
तुमचा सहवास,
तुमचा विचार
माझ्यासाठी मोलाचा आहे
दोस्तहो !
अस्तित्व आणि जाणिवेच्या खुणा
पुसता येणार नाहीत सहजी
हे सैतानानांही आहे ठाऊक
आणि आपल्याला
विचारांची मशाल पेटवायची आहे बिनदिक्कत
पेटवणारे असतील काही इतिहासात
आपल्याला वणवा विझवणाऱ्यांच्या यादीत
राहायचे आहे
नक्कीच!
© *रमेश*
http://www.shikshanyatra.blogspot.com
No comments:
Post a Comment