क्वारंटाईन ऑर नॉट टू बी...
दॅट इज द क्वेश्चन...
घरीच थांबावं की बाहेर जावं
हा एकच सवाल
या कोरोनाच्या भीतीनं
खाटेवर झोपलेला लुकडा होऊन
थांबावं सहभागाच्या अतीव आनंदानं...
की फेकून द्यावं हे लाॅकडाऊनचं वावटळ
त्यात गुंडाळलेल्या शासनाच्या आदेशासह
भविष्याच्या काळ्याशार डोहामध्ये?
आणि करावा सर्वांचा शेवट
एका पाॅझिटिव्ह बनण्याने..
माझा तुझा याचा आणि त्याचाही.
कोविद-१९ नावाच्या व्हायरसने
फुप्फुसाला असा डंख मारावा
की तोंडावरर नसलेल्या मास्कला
नसावा जागृतीचा किनारा
कधीही
पण नंतरच्या काळात
पुन्हा लक्षणं दिसू लागली तर
तर-तर...
इथचं मेख आहे!
नव्या व्हायरसच्या अनोळखी प्रदेशात
प्रवेश करण्याचा धीर होत नाही
म्हणून आम्ही सहन केला पाहिजे
हा एकलकोंडेपणा
सहन केला पाहिजे अज्ञातवास.. सजीवपणाने!
श्वसनयंत्रणेवर होणारे आघात
अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या स्वत्त्वाच्या रक्षणासाठी !
नाहीतर अखेर प्रिस्क्रिप्शनचा कागद घेऊन
उभे राहावे लागेल खालच्या मानेने
जेनेरिक औषध दुकानच्या दाराशी...
निसर्गा... तू इतका कठोर का रे झालास?
एका बाजूला, ज्यांनी आम्हाला औषधं द्यावी
ते हतबल होतील
__ आणि दुसऱ्या बाजूला, ज्यांनी आम्हाला संसर्गानं बाधित केलं
ते निर्लज्जही आम्हाला विसरतील ?
मग मास्क, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचे रिकामे नळकांडे घेऊन
हे करुणाकरा,
संसर्गामुळे बाधित झालेल्या कोरोनाग्रस्तांनी
कोण्याच्या पायावर डोकं आदळायचं?
कोणाच्या - पायावर-कोणाच्या...
*© रमेश*
subhashkumbhar@email.cim
ReplyDeleteSh
ReplyDeleteAmit kumbharsubhash416@gmail.com
ReplyDelete