101 जन्माला आला हेला, पाणी वाहून मेला निरक्षर किंवा निर्बुद्ध माणसाचे आयुष्य शारीरिक कष्टामध्येच जाते.
102 जळत घर भाड्याने कोण घेणार नुकसान करणार्या गोष्टीचा स्वीकार कोण करणार.
103 जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे दुसर्याच्या स्थितीत आपण स्वत:जावे, तेव्हा तिचे खरे ज्ञान आपणास होते.
104 ज्या गावाच्या बोरी त्याच गावच्या बाभळी एकमेंकाचे वर्म माहीत असणार्या माणसांशी गाठ पडणे.
105 ज्याचे खावे मीठ त्याचे करावे निट जो आपल्या वर उपकार करतो त्या उपकार कर्त्याला स्मरण करून त्याच्या यशासाठी प्रयत्न करावेत.
106 जशी देणावळ तशी धुणावळ मिळणार्या मोबदल्याच्या प्रमाणातच काम करणे.
107 ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे एखाद्याचे भले करायला जावे तर तो विरोधच करतो व आपलाच हेका चालवतो.
108 जी खोड बाळ ती जन्मकळा लहानपणीच्या सवयी जन्मभर टिकतात.
109 ज्याच्या हाती ससा तो पारधी ज्याला यश मिळाले तो कर्तबगार
110 जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही मूळचा स्वभाव आयुष्यात कधीच बदलत नाही.
111 जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धरी मातेकडून बालकावर सुसंस्कार होतात म्हणून ते भविष्यात कर्तुत्ववान ठरते.
112 झाकली मूठ सव्वा लाखाची व्यंग गुप्त ठेवणेच फायद्याचे असते.
113 टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही कष्ट केल्याशिवाय मोठेपणा मिळत नाही.
114 टिटवी देखील समुद्र आटविते सामान्य क्षुद्र वाटणारा माणूस प्रसंगी महान कार्य करू शकतो.
115 डोळ्यात केर आणि कानात फुंकर रोग एक आणि उपचार दुसराच
116 डोंगर पोखरून उंदीर काढणे प्रचंड परिश्रम घेवूनही अल्प यश प्राप्ती होणे.
117 तंटा मिटवायला गेला गव्हाची कणिक करून आला भांडण मिटविण्याऐवजी भडकावणे.
118 तळे राखील तो पाणी चाखील आपल्याकडे सोपविलेल्या कामाचा थोडाफार लाभ मिळविण्याची प्रत्येकाची प्रवृत्ती असते.
119 ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाण नाही पण गुण लागला वाईट माणसाच्या सहवासामध्ये चांगला माणूसही बिघडतो.
120 ताकापुरते रामायण आपले काम होईपर्यंत एखाद्याची खुशामत
No comments:
Post a Comment