Wednesday, 10 February 2021

Lavni

चंद्र, चांदवा, चांदणी, चंद्रमा

चंद्र उगवला गं पुनवेचा 
भरतं आलंया हुरद्याला
चढवा आभ्रे नवे करकरीत 
बैठकीतल्या गिरद्याला ||धृ||

आज चंद्रमा लाजत मुरकत 
उभी राहिली गडे
 नभी चांदणं घेऊन आली 
धवल टपोरे खडे
स्वप्नातील चांदवा खुणवितो  
पाहून ऐन्याकडे
कैद करीन मी हृदयमहाली 
सापडला तर त्याला ||१||

आवरत नाही वेग मनाचा 
कशी थोपवू त्याला
डचमळतो भर भरून उलटतो 
हा ज्वानीचा प्याला
दिलवर माझा आज फाकडा 
हाक ऐकुनी आला
हाका घाला लवकर बाई 
हलगी ढोलकी सुरत्याला ||२||

चटक चांदणी मी मदनाची 
आली जवानी फुलून
नयनबाण सोडीता इष्काचा 
पब्लिक जातंय भुलून
ऐन्यामध्ये रूप मावंना 
काया आलीया खुलून
साजिंदे बोलवा लवकरी 
साथ जीजी रं 
द्यायला ||३||

                              *रमेश*

No comments:

Post a Comment