गुळवेल किंवा गुडूची (शास्त्रीय नाव: Tinospora cordifolia, टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया) हृदयाच्या आकाराची पाने म्हणून कॉर्डिफोलिया हे नाव पडले. भारत, श्रीलंका, म्यानमार अशा उष्णकटिबंधीय प्रदेशांत आढळणारी गुळवेल ही एक वेल आहे. हिला अमृतवेल म्हणतात. या वनस्पतीचे सत्त्व औषध म्हणून वापरतात. त्याला गुळवेलसत्त्व असे नाव आहे. गुळवेल च्या पानांचा स्वाद कडू आणि तिखट असतो. गुळवेल चा उपयोग करून वात पित्त आणि कफ चांगले केले जाऊ शकतात. गुळवेल चा उपयोग करतांना त्याचे खोड वापरले जाते. आजकाल बाजारात गुळवेल च्या खोडा पासून बनवलेल्या गोळ्या देखील उपलब्ध आहे.
कॅन्सर, ज्वर, त्रिदोषविकार, त्वचा रोग, नेत्र विकार, पंडुरोग, प्रमेह, मधुमेह, मूत्रविकार, यकृत विकार, रक्तशर्कराविकार, वमनविकार, संग्रहणी, सर्दी पडसे, हृदयविकार, आदी विकारांवर गुळवेल हे एक उपयुक्त औषध आहे.
या वनस्पतीच्या कंदाचा आणि खोडाचा वापर औषधात केला जातो. या वनस्पतीची पानेही औषधी आहेत. गुळवेलीमध्ये टिनोस्पोरिन, टिनोस्पोरिन आम्ल, टिनोस्पोरिन गिलोइन, गिलोनिन ही रासायनिक गुणद्रव्ये आहेत. ही रसायने चवीला कडू असतात. तो कडवटपणा गुळवेलीच्या पानांत आला आहे.
गुळवेलीचे खोड चवीला कडू, तुरट आणि किंचित गोड असते. गुळवेलीच्या अनोख्या गुणांमुळे आयुर्वेदिक औषधांमध्ये या वनस्पतीचा उपयोग करतात. अशक्तपणा, कावीळ, कृमींचा त्रास, जुलाब, पोटातील मुरडा, मधुमेह, मूळव्याध, संधिवात, हगवण अशा निरनिराळ्या व्याधींमध्ये गुळवेलीचा उपयोग होतो. त्यामुळे गुळवेल ही वनस्पती आयुर्वेदात 'अमृतकुंभ' म्हणून ओळखली जाते. वाढत्या उकाड्यामध्ये गुळवेलीच्या पानांची भाजी आरोग्यदायी ठरते. मेथीच्या भाजीप्रमाणे भाजी केली जाते. भाजीपासून केलेले पराठेही चवदार लागतात.
No comments:
Post a Comment