Thursday, 12 August 2021

रानभाजी : घोळी

घोळीची भाजी अशी दिसते -
देशात घोळीची भाजी ही पावसाळ्यानंतर कधीकधी बाजारात दिसते. इथे मात्र फार्मर्स मार्केट सुरु झाले की हमखास मिळते. याचे इथले एक कॉमन नाव म्हणजे 'Pigweed'

घोळीची भाजी एक जुडी
१/२ वाटी मुगाची डाळ
कांदा लसूण मसाला चवीप्रमाणे
तेल, मीठ, दाण्याचे कूट, फोडणीची साहित्य

मुगाची डाळ भिजत घालावी.
घोळूची भाजी निवडून पाने आणि कोवळे देठ घ्यावेत. भाजी धुवुन निथळत ठेवावी.
तेलाची नेहेमीप्रमाणे फोडणी करून त्यात मूगाची डाळ परतावी, किंचीत पाण्याचा हबका मारून झाकण लावून अर्धवट शिजू द्यावी.
धुतलेली भाजी, मीठ, कांदा लसूण मसाला घालून नीट परतावे.
पुन्हा झाकण घालून भाजी नीट शिजवावी .
शेवटी दाण्याचे कूट मिसळून एक वाफ काढावी.
अवांतर माहिती -
आमच्या भागात घोळूची भाजी विकायला फारशी येत नसे पूर्वी . कारण ह्या भाजीची वेगळी लागवड केली जात नाही. शेतात तण म्हणुनच उगवलेले असते तेच शेतकरी काढून आणून भाजी करतो.
भाजीला कधीकधी थोडासा अंबटपणा असतो तसेच भाजीला भेंडीसारखी तार असते पण तेवढ्या प्रमाणात नाही.

ह्याचीच ताकातल्या पालकाप्रमाणे पण भाजी होते. तसेच पातळ डाळमेथी असते तशी पण तुरीच्या डाळीबरोबर शिजवून गरगट्यासारखी भाजी करतात.

या भाजीची माहिती 
१) प्रथम गोळ्याची भाजी धुऊन चिरून घ्यावी काय काकडे तेल घालून त्यात हिंग जिरे कढीपत्ता हळद तिखट आणि लसूण किसलेली कैरी टाकायची चिरलेली भाजी टाकायची शिजले की त्यात साधा वरण टाकायचं मग गोडा मसाला तोड पाणी सर्व टाकून मस्त व्यवस्थित शिजवायची आणि जेवायला बसताना तेलाची फोडणी करायची त्यात हिंग जिरे मोहरी लसणाच्या पाकळ्या आणि खडी लाल मिरची याची वरून फोडणी द्यायची आणि भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर खायला द्यायची.
२)प्रथम घोळभाजी तोडुन धुवून घेतली. कैरी पण धुवून घेतली. भाजी,कैरी,कांदा,कोथींबीर कट करुन घेतली.
नंतर गॕसवर कढई ठेवुन गरम केली. त्यात तेल टाकुन गरम केल. जिर मोहरी घालुन कांदा घातला. परतला. तिखट,मीठ,हळद घातली. परतल.
नंतर कैरी आणी भाजी घालुन मिक्स करुन पाणी घातल. अकळुन पाच मिनीट मंद आचेवर पाच मिनीट शिजु दिल.चनादाळीच पीठ घेतल.
उकळलेल्या भाजी मध्ये बेसन घालुन घोटल. बेसना च्या गुढळ्या होणार नाही असे घोटले. झाकण ठेवुन मंद आचेवर ठेवले.
झाकण काढुन भाजी व्यवस्थीत मिक्स केली. सर्व्हींग वाटी मध्ये काढली. कोथींबीर टाकली. घोळीची बेसन लावलेली मोकळी भाजी तयार झाली.
चिवईची भाजी आणि घोळीची भाजी जवळपास सारखी दिसली तरी त्या दोनही वेगळ्या भाज्या आहेत .

No comments:

Post a Comment