चुका काढणं सोपं असतं तर प्रत्येकाने चुका काढल्या असत्या; पण त्या चुका कळण्याइतकं ज्ञान/ शोधक वृत्ती/ निरीक्षण शक्ती, तर्कशास्त्र चुका काढणाऱ्याकडे असावंच लागतं. तरच चुका काढता येतात.
*चुका काढणं सोपं* हे वारंवार चुकणाऱ्यांचं तत्त्वज्ञान आहे. ज्यांना आपण म्हणजे उत्तर दिशेचा स्वामी आहे असेच वाटत असते. मात्र खरा तत्त्वचिंतक आपल्या चुका शोधून देणाऱ्याचे ऋण व्यक्त करत असतो; कारण त्यामुळे त्याला आपल्या चुका कळत असतात व त्या चुका दुरूस्त करण्याची संधी प्राप्त होत असते.
तपासणाऱ्यालाच चुका दिसतात. पारखणाऱ्याला असतील तरच गुण दिसतात. गुण नसतानाही एखाद्याची स्तुती करणारा भाट त्याचा एक नंबरचा शत्रू असतो. कारण तो गोडगोड बोलणारा 'फसव्या' असतो त्यास एक तर काहीच कळलेलं नसतं; किंवा कळलं तरी मुद्दाम आपली फजिती बघण्यासाठी तो त्या चुका सांगत नाही. तो प्रगती करण्यापासून आपणास रोखत असतो, म्हणजेच आपल्या प्रगतीच्या मार्गातील तो अडथळाच असतो; मात्र चुका शोधून देणारा ती सुधारण्याची संधीच देत असतो.
यासाठी आभार व्यक्त करायचे असतील तर चुका दाखविणाऱ्याचे करायला हवेत. मोघममध्ये ''फार छान! लई लई छान!! " म्हणणाऱ्याचे नाही.
कारण असं म्हणण्यासाठी कलाकृती, चित्र, वस्तू, विचार यांचं निरीक्षण सोडाच पण दर्शनही नाही घेतलं तरी चालतं; कोणालाही तसं म्हणत येतं पण चुका शोधणाऱ्याकडे सूक्ष्म निरीक्षणाबरोबरच भेदाभेद क्षमता, अचूक निरीक्षणशक्ती, ठोस निर्णय घेण्याची हिंमत असावी लागते.
चुका दाखविणाऱ्याकडे शत्रूबुद्धीने न बघता आपला हितचिंतक म्हणून पाहिले पाहिजे.
No comments:
Post a Comment