Sunday, 6 February 2022

बिहार राज्यातील "तीन वेडे" IAS अधिकारी : संतोषकुमार, विजयकुमार व रंजन प्रकाश

*बिहार राज्यातील "तीन वेडे" IAS अधिकारी. २०१९ मध्ये आपल्या गावात सुरू केली नि:शुल्क पाठशाला*
       -----🙏🙏🙏-----
[ *तिन्ही अधिकारी शिक्षक पगार  व स्टडी मटेरियलवर होणारा खर्च स्वतःच्या पगारातून पदरमोड करून करतात. स्वत: सुट्टीत येऊन अध्यापनही करतात*]
[{ *तिन्ही अधिकारी बाहेरच्या राज्यात सेवा करत असूनही बिहारकडे त्यांचे लक्ष आहे.*}]
(( *शिक्षणाचा हक्क सर्वांना आहे. तो मिळाला पाहिजे म्हणून  गावात नि:शुल्क शाळा काढली.*))
( *संतोषकुमार (२०१४ IAS) अरुणाचल प्रदेश मध्ये, विजयकुमार उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे तर रंजन प्रकाश असम येथे कार्यरत आहेत.*)
{ *आंबेडकर इनिशिएटिव फॉर दी मर्जिन लाइज्ड (AIM) नावाने शैक्षणिक कार्य सुरू केले.*}
[[ *समस्तीपुर गोपालगंज एवं औरंगाबाद जिल्ह्यातील बसंतपुर  येतील रमणी गावात  सामाजिक दायित्व म्हणून शाळा सुरू केली. दोन वर्षांत सामान्य कुटुंबातील ५५० विद्यार्थी नि:शुल्क शिक्षण घेत आहेत. जवळपास ४०% मुली शिक्षण घेत आहेत. या मुलांना स्टडी मटेरियल व मोफत ट्यूशनसुद्धा दिली जाते.*]]
(( *संतोषकुमार यांनी समस्तीपुर बसंतनगर येथील रमनी गावात, विजयकुमार यांनी गोपालगंज पिठौरी गावात तर रंजन प्रकाश यांनी औरंगाबाद येथील तरारी गावात शाळा सुरु केली आहे ‌.*))
{{ *वरील तिन्ही गावात नेमलेल्या शिक्षकांचा पगार व स्टडी मटेरियल व अन्य खर्च तिन्ही IAS अधिकारी पगारातून करतात. दरमहा ते ठराविक पगारातील रक्कम यासाठी बाजूला काढून ठेऊन खर्च करतात. सुट्टीत येऊन ते अध्यापनसुद्धा करतात.*}}
[[[ *संतोषकुमार , विजयकुमार व रंजन प्रकाश यांनी शिक्षण घेऊन UPSC परीक्षेत यश मिळवले आहे. आपण मोठे झाल्यावर मागे वळून बघितले पाहिजे. बिहारमधील मुले प्रज्ञावंत आहेत. गरिबीमुळे शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून त्यांनी गावात नि:शुल्क शाळा काढण्याचा निर्णय घेतला. शाळेत गेल्याशिवाय शिक्षणाचे महत्त्व समजणार नाही असे तिघांना वाटत होते. संतोष व विजय हे बॅचमेट आहेत.*]]]
((( *बिहारमधील एका वेळी १९ मुले IAS अधिकारी झाली आहेत. ही बिहारची संपत्ती आहे, ऐश्वर्य आहे. संतोषकुमार, विजयकुमार व रंजन प्रकाश यांच्यासारखे बिहारच्या मातीतले "महावेडे",  "संवेदनशील" व समाजऋण फेडणारे अधिकारी असतील तर  बिहार हा नेहमीच देशात अव्वल स्थान पटकावणार आहे यात शंकाच नाही.*)))
{{{ *IAS होऊन राज्याबाहेर नोकरी करत असतानाही तिन्ही अधिकाऱ्यांचे लक्ष मात्र आपल्या बिहार राज्याकडे आहे. हे समाजभान व‌ मातीवर असणारे प्रेम आहे.*}}}
[[[[ *या तिन्ही अधिकाऱ्यांना परमेश्वर आरोग्यदायी दीर्घायुष्य देऊ दे ही परमेश्वराचे चरणी मनोमन प्रार्थना!*]]]]
संपत गायकवाड (माजी सहाय्यक शिक्षण संचालक)

No comments:

Post a Comment