Monday, 28 May 2018

आई

आई

जिथे आई तिथे घर
बाकी इमारती सा-या
तिला सोडून एकटे
लोक करतात वा-या

आई विठूचे राऊळ
आणि पंढरीची वाट
भाव हृदयी शीतल
वसे चंद्रभागा काठ

आहे दैवत देवांचे
धूळ चरणाची बुका
डोईवरचा पदर
असे भगवी पताका

घडे सहजी दर्शन
दंडवत तिला एक
त्याच अखंड विश्वाला
प्रदक्षणा होती लाख

No comments:

Post a Comment