Monday, 28 May 2018

उदंड कवी

.    *उदंड कवी*

अमाप झाले ग्रुप आणि
उदंड झाले कवी
आली लिहाया सुरसुरी
नित्य कविता नवी

उथळ पाणी खळखळाट
बुडबुडे हवे तसे
उगवतात मावळतात
सँलोमन ग्रँडीच जसे

कवी म्हणजे वाटते आहे
बिनतोटीचा गळका नळ
लावा भांडी भरा पाणी
भांड्याचाही फुटका तळ

वाचतो काय लिहितो काय
ज्याचे त्याला कळेना
ठिबक ठिबक टपक टपक
ब्याद काही टळेना

ग्रुप म्हणजे कचरापेटी
समजून देतो फेकून
द्या पसंती करा वाहवा
हत्ती बनतोय ढेकूण

माझ्यासारखा मीच कवी
कसला विचार,छंद
कुठला भाव घेऊन बसता
कुठचे लेखन शुद्ध

एकच एवढी विनंती
चार जोडे जरूर हाणा
र ला र,  ट ला ट
मला महाकवी म्हणा

No comments:

Post a Comment