. *प्रलयाचा महोत्सव*
नवा झुकाया लागला
जुना थकाया लागला
कुणी आतल्या आतून
पोती विकाया लागलास
बांधू आता लगेचच
मंत्री बोलतो सुसाट
थापा मारूनी खुशाल
पाही इलेक्शनची वाट
एक मशिनरी आली
जीव खाली वर झाला
एकएका वाहनानं
श्वास रोखून धरला
मोठी प्रवासाची चिंता
उसळी मारतो चालक
गाडी उगाच लाजते
खाली रुतलेले चाक
सारा ढपले उत्सव
चाललाहा दीर्घकाळ
पाही कौतुकाने जन
कधी येईल ती वेळ
कोडे सुटता सुटेना
काय करावे कळेना
पूल बांधण्यसआज्ञा
तिसऱ्या वर्षी मिळेना
. *रमेश*
No comments:
Post a Comment