. *पाहता पाहता*
थांबला पाऊस तिजला पाहता पाहता
मेघही जागीच थिजला पाहता पाहता
केवढा विश्वास पाऊस वाटला यावया
बांधही नाहीच भिजला पाहता पाहता
जाणता आकांत शिणला बापही दावणी
रोडक्या बैलास खिजला पाहता पाहता
पारवा रानात घुमला कैकदा शोधण्या
आपली मैत्रिण लाजला पाहता पाहता
गिरणी थकून थांबले कामही शेवटी
चूल ना पेटली विझला पाहता पाहता
लाजरी डोळ्यांस भिडता चांदणी आपली
चंद्रही घायाळ निजला पाहता पाहता
. *चाँद परछाई*
No comments:
Post a Comment