Wednesday, 30 May 2018

गझल

.       गझल

घर माझेही उन्हात
घर त्याचेही उन्हात

भर माळाला उजाड
घर साऱ्यांचे उन्हात

सल सांगावी कुणास
जर चाफाही उन्हात

धग जिलाही उगाच
बघ गाथाही उन्हात

छळ साहाणे कठीण
पण येशूही उन्हात

जन बाजारू असेल
तर राजाही उन्हात

No comments:

Post a Comment