*जय किसान-जय जवान*
देश,मातीसाठी पर्वा
न करत्यात जिवाची
ओवी एकतरी गाऊ
शेतकरी-जवान भावांची...
एक मातीत मळतो,
घाम गाळतो, वावरात
दुसरा सीमेवर लढतो,
जिवाशी खेळतो दिसरात
नाही दोघांना खंत
अंगावरल्या घावांची...१
चटणी भाकरी मिळेल ते
सुखाने खातो शेतात
सीमेवरती पहारा घेऊन
बंदूक हातात.
उदार होऊन आण
घेऊन भारतमातेची...२
कधी दुष्काळ ओला
कोरडा सगळं साहून
दुसरा पहारा देतो
बर्फाच्या डोंगरी राहून
सेवा हुरद्यापासून करत्यात
आपल्या देशाची...३
काळ्या आईची सेवा
शेतात कष्टानं राबताना
मायभूमीला सलाम लढून
बलिदान करताना
करा कदर थोडी या
धरतीच्या छाव्यांची...४
आला दिवस साजरा
करत्यात दोघं सेवेत
एक सपान सर्वा दिवस
सुखाचे यावेत
सणवार नाही
नाही आशा पदव्यांची...५
. *रमेश*
No comments:
Post a Comment