Sunday, 3 June 2018

रे पावसा

.    *रे पावसा*

कधी येशील धावत
झाले काळजाचे पाणी
किती दिस अाम्ही आणि
गावी कोरडीच गाणी

आतुरता बघ कशी 
वाट पाहताहे रान
सुके पाखरांचा प्राण
चराचरही हैराण

अगा पावसाच्या देवा
थोडी तरी दया कर
नको आम्हा महापुर
फक्त वाहू दे निर्झर

तू रे कुबेराचा धनी
किती गाऊ गुणगान
काय देऊ तुला देणं
विनंतीला माझ्या मान

नाही स्वागत कमान
दोन कवितेच्या ओळी
तुजसाठी सायंकाळी
ऐक चातकाची हाळी

असे मागणे अखेर
बलिराजाशी दे बळ
नको सलग दुष्काळ
नको ओला सुका छळ

.                *रमेश*
.

No comments:

Post a Comment