Monday, 2 July 2018

मिरची

*त्यांच्या नाकाला मिरची झोंबते*

सत्य कटूच असते नेहमी
ऐऱ्या गैऱ्याला नसते हमी
गुणवंतला लेखतात कमी
नाही दिसत नाळ त्यांच्या
नाकाच्याखाली लोंबते.......            १

खरे माझेच म्हणा हा वादा
करती स्वतःच्या हिताचा कायदा
जिथे नसेल आपला फायदा
द्राक्षे आंबट म्हणून पळती
त्यांची अक्कल तिथेच थांबते...               २

कसे म्हणावे त्यांना साधू
बुद्धी त्यांची आधीच अधू
आपले विचार पाहती लादू
हिटलराची वंशावळही
मनात आम्हाला गमते...      ३

.                        *रमेश*

No comments:

Post a Comment