Sunday, 1 July 2018

कविता आणि अभिव्यक्ती

*अभिव्यक्ती आणि कविता*

भवतालात अनेक घटना घडत असतात. साहजिकच संवेदनशील मनात त्याबद्दल विचार प्रक्रिया सुरू होऊन भाव निर्माण होतात. हे भाव मनातून चेहऱ्यावर,  तर कधी चित्र, कथा, काव्य, स्वर, नृत्य, नाट्य या माध्यमातून अभिव्यक्त होतात. मनातील विचार व कल्पनेतूनही
जो तो आपापल्या परीने व्यक्त होत असतो. म्हंटले तर कविता हे माध्यम सर्वप्रिय, सहजसाध्य व प्रभावी माध्यम आहे. म्हणूनच या माध्यमातून व्यक्त होणाऱ्यांची संख्या अधिक.
काव्य म्हणजे वृत्त(बातमी) नव्हे; बातमीवर काव्य बेतले जाऊ शकते. पुनरुक्ती टाळून मोजक्या शब्दांत व्यक्त होणे हे माव्याचे वैशिष्ट्य जपले पाहिजे.( *पुनरुक्ती काफी गंभीर किस्म का काव्यदोष है।* )
रचना हा तर कवितेचा स्थायीभाव, त्यासाठी थोडा काव्यशास्त्राचा अभ्यास हवाच. केवळ उत्तम निरीक्षणानेही तो आकळू शकतो.
वृत्त , अलंकारांची योजना काव्याच्या सौंदर्यात भर घालते; कवितेची गेयता वाढविते.
नसता मुक्तछंदात लिहिणे उत्तम.
इतरांच्या काव्यातील आशय भावला व आपणासही त्या विषयावर लिहावेसे वाटले तर, मूळ कवितेची पुनरावृत्ती टाळून प्रस्तावनेत कवी/कवयित्रिच्या नावाचा उल्लेख करावा.
विडंबन करायचे असेल तर उत्तम व सर्वश्रुत कविता निवडावी. विडंबन व्यक्तिगत व्यंगावर निर्देश असणारे, भावना दुखावणारे न करता. सार्वत्रिक व्यंगावर बोट ठेवणारे असावे. तेथेही मूळ कविता कवीच्या नावासह उद्धृत करावी.
सहज सुलभ भावनाविष्कारातून कविता जन्माची. ओढून ताणून लिहू नये. लिहिल्यानंतर पुन्हा वाचावी. आवश्यक तर पुनर्लेखन करावे. आपण नवखे असू, तर जाणकारांकडून संस्कारित(कारागिरी) करून घ्यावी. ( गझलच्या बाबतीत जाणकार याला *इस्लाह* म्हणतात. प्रसिद्धीची घाई न करता निर्दोष करून द्यावी.

SHIKSHANYATRA
Blog spot.

No comments:

Post a Comment