Saturday, 28 July 2018

दशाक्षरी

*दशाक्षरी*

पाऊस वारा या जलधारा
तुझ्या बटांतून निथळती
थेंब टपोरे माणिक मोती
गालावरच्या तुझ्या खळीला
बघ लाली तेव्हा आली होती

होती सांज मंद अनावर
आणि हळवे गीत कुणाचे
तू गाताना मीही क्षणभर
हरवून गेलो साऱ्या वाटा
त्या वाटांचे गाणे मनभर

मनभर वारा आणि गाणे
घेऊन फिरतो मीही वेडा
शोधीत वाटा रानफुलांच्या
सापडते सारे अचानक
गुंत्यामधुनी तुझ्या बटांच्या

.   © *रमेश कुरलीकर*

No comments:

Post a Comment