तुझ्यासारख्या गंधफुलांनी
फुलला माझा मळा ॥
सखे गं हळूच खुड मंजुळा ॥धृ॥
मिरगाची पेरणी साधली
रिमझिम पाऊस आला खाली
धरती हिरवा शालू ल्याली
थेंब दवाचा तुझिया गाली
जीव तुझ्यावर खुळा ॥१॥
सखे गं...
वाऱ्यावरती पीक डोलते
तुरा शीरावर सहज तोलते
फांदीआडून फूल बोलते
तुझे नि माझे गुपित खोलते
कांदा भाजी मुळा ॥३॥
सखे गं...
सुगी खळ्यावर भरल्या राशी
बाळगलेले स्वप्न उराशी
तूही अल्लड हसून जराशी
खेटून लाजत माझ्यापाशी
दाटून आला गळा ॥३॥
सखे गं...
. *रमेश कुरलीकर*
No comments:
Post a Comment