*संतसंग*
संतसंगतीचा। महिमा अपार॥
करी दु:ख दूर ॥। भवताप ॥१॥
संतमायबाप। शीतल चंदन ॥
करावे वंदन॥। तयालागी ॥२॥
संतचरणाची। काय वाणू कीर्ती॥
उभी प्रेममूर्ती ॥। चक्षूंपुढे॥३॥
दया क्षमा शांती । संतजनांपाशी॥
चारोधाम काशी ।॥ अन्य नाही ॥४॥
शीतल चांदणे। हृदय संतांचे॥
दु:खी पिडीतांचे ॥। नीजस्थान॥५॥
संतकृपा होता । 'मी'पणा गळतो॥
आणिक कळतो ।॥ परमार्थ॥६॥
सत्व रज तम। गुणांची पारख॥
मूढाशी कारक ॥। उपरती ॥७॥
संतवाणी दूग्ध। स्वर्गीचे अमृत ॥
सेवी तो जागृत ॥। होई जगी॥८॥
संताशी शरण । जाई एक वेळ ॥
अद्वैताचा खेळ ॥। नामशेष ॥९॥
*चंदन* झिजता। देहभान हरे॥
सुगंधाने भरे ॥। आसमंत ॥१०॥
चंद्रकांत निकाडे *'चंदन'*
No comments:
Post a Comment