विठ्ठल अंतरी ।
विठ्ठल बाहेरी ॥
श्वास चराचरी ॥।
विठ्ठलची ॥१॥
विठ्ठल सासरी ।
विठ्ठल माहेरी ॥
सदाच सोयरी ।॥
विठूराया ॥२॥
सुखाची अोसरी ।
विठ्ठल घरात ॥
विठ्ठल शेतात ।॥
सखा माझा ॥३॥
विठ्ठल पुढती ।
विठ्ठल माघारी ॥
आषाढाची वारी ॥।
कार्तिकीही ॥४॥
सदैव सोबत ।
विठ्ठल एकांत ॥
विठ्ठल लोकांत ॥।
जीवभाव ॥५॥
विठ्ठल सुगंध ।
विठ्ठल नामात ।।
विठ्ठल कामात ।॥
*चंदनाशी* ॥६ ॥
No comments:
Post a Comment