अनुस्वार रुसतो तेव्हा
अांबाचा आबा होतो
बांबूचा बाबू आणि
संभाचा सभा होतो
आबा झाडावर लटकतो
बाबूची शिडी करतात
सगळे मित्र आवर्जून
सभाला सलाम करतात
चिंताची चिता होते
भलतेच नशिबी येते
म्हातारी जिवंतपणी
सरणावर जळून जाते
मांडीवरचे लहान मूल
माडीवर पळून जाते
खंत होते खत तीही
मातीत मिसळून जाते
गंधा होतो गधा मात्र
उकिरड्यावर लोळू लागते
... ... वरची लाथ
मग गाडीवर बसते.
दंगा करणारी मुले
दगा देऊ लागतात
फुंगा घालणाऱ्या मुली
फुगा घेऊ लागतात
वंदन होते वदन
वटवट करण्यासाठी
पेंढा होतो पेढा
तोंडात भरण्यासाठी.
. *चद्रकात निकाडे*
No comments:
Post a Comment