Friday, 31 August 2018

बासरी

नाही कळली बापा हालत सासरी होती कशी
कान्हा असुनी नाही जाणत  बासरी होती कशी

झाडे थकली तीही गारद झाली उसणी छाया
आली नकली मोठी आफत भासरी होती कशी

वादा करिता वाया गेली सारी जिंदगी फुका
जो तो म्हणतो आता मजला पासरी होती कशी

काटा रुतला पायी तेव्हा ऊठल्या नाना कळा
काया दुखरी झाल्या वरही हासरी होती कशी

गाठी कचल्या माना मोडत जाचक वाटा वनी
सारे छळती ती मग सोसत कासरी होती कशी

देई लंगडी दाना आपण आणखी दोषा जरी
आता कोणी पाही ती भर वासरी होती कशी

No comments:

Post a Comment