Saturday, 1 September 2018

गझल - 12

मी वाटले जगा जे होते करात माझ्या
हातात शेवटाला उरली परात माझ्या

घायाळ चांदणी जी ठसली उरात माझ्या
शोधीत वाट असता दडली घरात माझ्या

मी मागता जरासे वाढीव भाव माला
केली कपात त्यांनी थोडी दरात माझ्या

नाकारली तरीही नारी सखोल होती
का कोणत्या भीतीने लपली नरात माझ्या

एकेक वीट रचली होती नव्या दमाने
आला कसा कळेना अडणा थरात माझ्या

घोडे उनाड उधळे घेऊन सोबतीला
दारात थांबली ती सगळी वरात माझ्या

No comments:

Post a Comment