*किबोर्डच्या त्रुटींमुळे नेहमी चुकणारी जोडाक्षरे*
त्र - ञ ❌
त + ् + र = त्र ✅
हृ - ह्रु ❌
हृ - र्ह ❌
ह + ऋ = हृ ✅
ऱ्य - -य ❌
र + ़ + ् + य = ऱ्य ✅
*नेहमी चुकणारे शब्द*
नी❌- नि ✅
खुप❌- खूप ✅
तु❌- तू ✅
तीला❌- तिला✅
तीचे❌- तिचे✅
तीने ❌- तिने✅
मुल❌- मूल✅
चुल❌- चूल✅
फुल❌- फूल✅
(वरील प्रकारचे शब्दांना ने व चा,ची,चे विभक्ती प्रत्यय लागताना मुलाने/मुलाचे,मुलाची,मुलाचा- फुलाने/फुलाचे,फुलाची,फुलाची- चुलीने/चुलीचे,चुलीचा,चुलीची असे लेखन व्हावे.)
पाऊसात❌-पावसात✅
जावून❌- जाऊन✅
(जाणे,खाणे,पिणे,देणे,घेणे अशा दोन अक्षरी क्रियापदांची सामान्यरुपे तयार होताना जाऊन,खाऊन, पिऊन, देऊन, घेऊन अशी रूपे घ्यावीत.)
तर
भरवणे=भरवून
फिरवणे=फिरवून
गिरवणे=गिरवून
जिरवणे=जिरवून
अशी सामान्यरूपे होतात.
No comments:
Post a Comment