Sunday, 9 September 2018

गझल : मीच माझी

.         *मीच माझी*

मीच माझी आरती ओवाळतो कितीदा
हाय वांझोट्या स्तुतीला भाळतो कितीदा

होत स्वार्थी मानवा तू पाप जाणताही
लाख जीवांच्या वनांला जाळतो कितीदा

रोज काव्ये आणखी का बांधतो नव्याने
त्राण नाही त्या वहीला चाळतो कितीदा

दोस्त जानी सांगतो आहे तुला हिताचे
मात्र त्यालाही असूये टाळतो कितीदा

काल जे तू घातले ते कोवळ्या फुलांचे
हार काेमेजून गेले माळतो कितीदा

ध्यास नाही तू तरीही  घालतो रतीबा
चाँद अश्रूंना निनावी ढाळतो कितीदा

No comments:

Post a Comment