यात, मतल्यातील काफ़िये आहेत ’काही’ व ’नाही’! (लक्षात घ्या, मनात व जगात हे काफ़िये नाहीत कारण त्यापुढे समान शब्द आलेले नाहीत. मनात च्या पुढे ’काही’ हा शब्द असून जगात च्या पुढे ’नाही’ हा शब्द आहे. या रचनेला रदीफ़ नाही.)
तेव्हा, मतल्यात दोन्ही ओळीत काफ़िये आले, ’नाही’ व ’काही’ हे!
आता, दुसर्या शेरात पुन्हा ’नाही’ व ’एकाधिकारशाही’ असे शब्द दोन्ही ओळींच्या शेवटीच आले आहेत. यातील, नाही व एकाधिकारशाही हे पुन्हा काफ़ियेच होऊ शकतात. त्यामुळे दुसरा शेरही मतल्यासारखाच झाला आहे. मात्र तसे जरूरीचे नाही. हे तिसया शेरावरून सिद्ध होते.
तिसया शेरात फ़क्त दुसयाच ओळीच्या शेवटी प्रवाही हा काफ़िया आला आहे.
तेव्हा:
१. मतला हा शेर गज़लेचा पहिला शेर असून त्यात दोन्ही ओळीत काफ़िया व रदीफ़ (त्या विशिष्ट गजलेला रदीफ़ असल्यास ) यावेच लागतात.
२. मतल्याचेच नियम पाळणारे गज़लेतील सर्व शेर असू शकतात, पण असलेच पाहिजेत असे नाही. त्यांच्यात फ़क्त दुसयाच ओळीत काफ़िया व रदीफ़ (त्या विशिष्ट गजलेला रदीफ़ असल्यास ) यावेच लागतात.
काफ़िया नसलेली गज़ल असू शकत नाही. रदीफ़ नसलेली गज़ल असू शकते.
मतला व शेराचे आणखी एक उदाहरण:
कळेना कुठे सर्व ’लंपास झाले’
किती राहिले नी किती ’श्वास झाले’
तुझी पावलापावलाला प्रचीती
मला वाटले फ़क्त ’आभास झाले’
(काफ़िये लंपास, श्वास, आभास व रदीफ़ ’झाले’!)
Wednesday, 24 October 2018
गझल १७
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment