एकंदर -
गज़ल - किमान पाच ’दोन दोन’ ओळींच्या स्वतंत्र कवितांची मालिका, ज्यात गज़लतंत्र पाळले गेलेले असून आशय हा स्वानुभुती, प्रेम, व्यथा, तत्त्वज्ञान यावर भाष्य करणारा आहे.
शेर / द्विपदी - गज़लेतील कोणत्याही संलग्न दोन ओळी ज्यामधे पहिल्या ओळी्तील आशयाचा प्रभावी समारोप दुसया ओळीत केलेला असतो.
मतला - गज़लेचा पहिला शेर, ज्यात दोन्ही ओळींमधे काफ़िया व रदिफ़ येतात.
रदीफ़ - मतल्याच्या दोन्ही ओळींच्या शेवटी व त्यापुढील प्रत्येक शेराच्या दुसया ओळीच्या शेवटी येणारे समान सुट्टे अक्षर / शब्द / शब्दसमूह! पुढील शेरांच्या पहिल्याही ओळीत रदीफ़ आली तरी चालते, पण दुसया ओळीत यावीच लागते. एका गज़लेत एकच रदीफ़ सर्वत्र येते. रदीफ़ बदलू शकत नाही. रदीफ़ हा काफ़ियाचा भाग नाही. ते समान सुट्टे अक्षर, सुट्टा शब्द किंवा सुट्टा शब्दसमूह असतो. रदीफ़ नसलेल्या गज़ला असू शकतात.
काफ़िया - मतल्याच्या दोन्ही ओळींमधे रदीफ़च्या अलीकडे व त्यापुढील प्रत्येक शेरातील दुसया ओळीत रदीफ़च्या अलिकडे येणारा ’एक शब्द / एक स्वर’ म्हणजे काफ़िया! काफ़िया जर शब्द-काफ़िया असला तर प्रत्येक काफ़ियातील एकंदर अक्षरांपैकी किमान शेवटून एक अक्षर तरी समान राहतेच. त्या आधीची अक्षरे वेगवेगळी असू शकतात. कफ़ियाच्या ’शेवटून’ एकाहून अधिक अक्षरे समान असणे शक्य असते. पण एक तरी अक्षर समान असलेच पाहिजे. स्वरकाफ़ियामधे रदीफ़च्या आधी येणाया शब्दातील फ़क्त शेवटच्या अक्षराचा स्वरच समान राहतो. मतल्यात दोन्ही ओळीत एकच काफ़िया घेता येत नाही. अन्यथा ती रदीफ़च समजली जाईल. मतल्यातील एखादा काफ़िया पुढील शेरांमधे वापरणे तांत्रिकद्रुष्ट्या चालते. तोच काफ़िया एकाहून अधिकवेळा किंवा सर्व शेरांमधे आला तरी चालू शकते. मात्र, मतल्यामधे तोच काफ़िया दोनदा येऊ शकत नाही. काफ़ियाशिवाय गज़ल असू शकत नाही.
अलामत - काफ़ियातील शेवटून समान असलेल्या अक्षरांआधी जे अक्षर येते त्याचा स्वर म्हणजे अलामत!
Wednesday, 24 October 2018
गझल २२
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment