आणखी एक उदाहरण!
जरा कुठे सरावलो स्वत:त मी रमायला
लगेच पोचला तुझा सुगंध घमघमायला
दिमाख दाखवून फ़क्त विरघळून संपलो
जसा विड्यास लावतात वर्ख चमचमायला
यात रदीफ़ नाही. तसेच, समान भाग आधीच्या गज़लेप्रमाणे ’अले’ सारखा ’अला’ असा नसून ’अमायला’ असा आहे. त्यामुळे काफ़िये झाले रमायला, घमघमायला, चमचमायला!
आणखी एक उदाहरण घेऊ!
अभ्यास अन तयारी सारे उगीच आहे
जी जी निघेल इच्छा ती वेगळीच आहे
चोरून पाहताना, चोरून पाहतो मी
मीही तसाच आहे, तीही तशीच आहे
यात ’आहे’ ही रदीफ़ झाली. काफ़िये झाले उगीच, वेगळीच, तशीच! कारण त्यात ’ईच’ हा भाग समान आहे.
या गज़लेत ’प्रतीत’ असा काफ़िया घेता येणार नाही, कारण त्यात ’ईच’ च्या ऐवजी ’ईत’ असे आले.
स्वरकाफ़िया हा एक महत्वाचा प्रकार आहे. स्वरकाफ़ियामधे रदीफ़च्या आधी येणाया शब्दातील शेवटच्या अक्षराचा फ़क्त स्वर समान असावा लागतो. उदाहरण!
आज आनंदात राहू, पाहुया पुढचे पुढे
वास्तवे बाजुस सारू, पाहुया पुढचे पुढे
मी नको आहे तुला हे माहिती आहे मला
एक छोटा जन्म काढू, पाहुया पुढचे पुढे
यात ’पाहुया पुढचे पुढे’ ही रदीफ़ झाली! आता त्या आधी आलेले शब्द कोणते? तर राहू, सारू, काढू! यात समान फ़क्त ’ऊ’ हा उच्चारच आहे. याला स्वरकाफ़िया असे म्हणतात.
Wednesday, 24 October 2018
गझल १९
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment