आता प्रश्न असा येईल की उला, डुला, तुला यालाच रदीफ़ का नाही म्हणायचे? तर रदीफ़ म्हणजे न बदलणारी अक्षरे / शब्द/ शब्दसमूह! उला, डुला व तुला मधे उ, डु व तु हे असमान आहेत. ते एकसारखे नाहीत. नुसतेच ’ला’ हे अक्षर समान आहे. पण ’ला’ लाही रदीफ़ म्हणता येणार नाही कारण ते अक्षर ’काफ़िया’चा भाग आहे, स्वतंत्र, सुट्टे अक्षर नाही.
रदीफ़ नसलेल्या गज़लेला ’गैरमुर्रद्दफ़’ गज़ल असे म्हणतात. रदीफ़ असलेल्या व रदीफ़ नसलेल्या दोन्ही गज़ला तितक्याच महत्वाच्या असतात. रदीफ़वर दर्जा अवलंबत नाही.
काफ़िया - रदीफ़ असलेल्या गज़लेच्या मतल्यात दोन्ही ओळीत रदीफ़च्या आधी येणारा व पुढील शेरांमधे दुसया ओळीत रदीफ़च्या आधी येणारा सुट्टा शब्द , ज्यातील शेवटचे किमान एक अक्षर समान असून त्या आधीची अक्षरे भिन्न असतात, म्हणजे काफ़िया! ज्या गज़लेला रदीफ़ नाही त्या गज़लेतील मतल्याच्या दोन्ही ओळींच्या शेवटी येणारा सुट्टा शब्द , ज्यातील शेवटचे किमान एक अक्षर समान असून त्या आधीची अक्षरे भिन्न असतात, जो पुढील प्रत्येक शेरातील दुसया ओळीत येतोच तो काफ़िया!
काफ़िया हा गज़लेतील सर्वात महत्वाचा भाग आहे. काफ़िया नसेल तर गज़ल ही रचना गज़लच ठरू शकत नाही.
काफ़ियामधील जो शेवटचा भाग असतो तो समान असतो.
जसे:
आधार
बाजार
ठार
वार
बेजार
धार
यात ’आर’ हा उच्चार समान आहे.
तसेच:
वादळ
जळ
काजळ
मळ
हळहळ
यातील ’अळ’ हा उच्चार समान आहे.
काफ़ियाची उदाहरणे!
घातली मी साद तेव्हा थांबले नाही कुणी
चांगले आहेत सारे, आपले नाही कुणी - मतला!
आज ती आली समोरी, चौकशी झाली जरा
वेळही गेलीच होती, ताणले नाही कुणी - दुसरा शेर!
यात, वर पाहिल्याप्रमाणे ’नाही कुणी’ ही रदीफ़ झाली. थांबले, आपले, ताणले यातील समान भाग आहे ’अले’! म्हणजेच, थांबले, आपले, ताणले हे काफ़िये झाले. (नुसत्या समान भागाला, जसे ’अले’ ला काफ़िया म्हणत नाहीत. संपूर्ण शब्दालाच काफ़िया म्हणतात. जसे थांबले, आपले, ताणले!) आता या गज़लेत पुढे, मावले, कापले, सोकावले, भांबावले असेच काफ़िया येऊ शकतील.
Wednesday, 24 October 2018
गझल १८
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment