Saturday, 9 March 2019

फटका

'फटका' नावाचा एक काव्य प्रकार आहे।
मराठी काव्यात अनेक प्रकार हाताळले गेले आहेत।
ऊदा. अभंग, ओवी, भारुड, फटका, गण, गौळण, लावणी, सुनीत, पोवाडा, जोगवा, गोंधळ, देवीची गाणी, श्लोक, मुक्तके, वात्रटिका, गजल, चित्रपट गीत, लोकगीते, भक्तीगीत।

फटका - कविवर्य अनंत फंदी यांनी फटका हा काव्यप्रकार रूढ केला। अत्यन्त द्रुत लयीत म्हटलं जाणारं हे पद व्यावहारिक नीतिमत्तेचे मार्गदर्शन करते। रचनाशैलीच्या नावाप्रमाणेच तिच्या अर्थामध्ये चाबकाच्या फटक्याचा तिखटपणा निर्माण करणाऱ्या कठोर शब्दांचा वापर आणि मोघम शब्द न वापरता नेमकी स्पष्टोक्ति ही वैशिष्ट्ये असतात।

"अनंत फंदी" ह्यांचा एक गाजलेला अप्रतिम फटका....

बिकट वाट वहिवाट नसावी , धोपट मार्गा सोडू नको
संसारामधि ऐस आपुल्या , उगाच भटकत फिरू नको ||

चल सालस पण धरुनी निखालस बोला खोट्या बोलू नको
अंगी नम्रता सदा असावी राग कोणावर धरु नको ||

नास्तिक पणात शिरुनि जनाचा, बोल आपणा घेऊ नको
भली भलाई करा काही, पण अपधर्मंमार्गी शिरू नको ||

वर्म काढुनी शरमायाला, उणे कुणाला बोलू नको
बुडवाया दुसरयाचा ठेवा, करुनी हेवा झटू नको ||

उगाच निंदा स्तुति कुणाची स्वहितासाठी करू नको
बरी खुशामत शहाण्याची ही मूर्खाची मैत्री करू नको ||

कष्टाची बरी भाजी भाकरी तुप साखरेची चोरी नको
आल्या अतिथि मुठभर द्याया मागे पुढती पहु नको ||

हिमायतीच्या बले गरिबाला तू गुरकावु नको
दो दिवसाची जाइल सत्ता अपेश माथा घेवू नको ||

सुविचारा कतरू नको , सतसंगा अंतरु नको
द्वैताला अनुसरू नको , हरिभजना विसरु नको ||

No comments:

Post a Comment