Tuesday, 26 March 2019

Gazal

.     *हृदय जेव्हा जळते*

वाचता ओळीस एका हृदय जेव्हा जळते
शायराच्या भावनेसह गझल तेव्हा कळते

चाखताना पीठ थोडे भान ठेवूया सदा
समजते मग ते बिचारे आंधळे का दळते

एकरूप व्हाल जेव्हा वाचताना तोच शेर
अहंकाराचे पान पिकून हळूच गळते

भावना कशी आतून पोखरते शरीरा
विरह सोसता कधी हळूच हेही कळते

पेटते पाणी कधी अन गारवाही झोंबतो
बिजली ती अंगांगी का उरी सळसळते

अनुभवा तुम्ही खुशाल अाज ना उद्या
अंतरीची वेदना कुणा कुणास छळते

चाँद विरतो शुद्ध पक्षी झुरतो क्षण एक एक
अापल्या दु:खास बघूनी का कुणी हळहळते

.                  चाँद परछाई

No comments:

Post a Comment