Monday, 22 April 2019

खंत

रणांगणावर
मोडक्या ढाली,
तलवार गंजलेली,
धनुष्य तुटले ताण,
बोथट बाण,
निधार शस्त्रे, स्वैर अस्त्रे,
घेऊन लढणारे बहाद्दर पाहून
खू ऽऽऽऽऽऽ प काही बोलायचंय,
थोडं लिहायचंय,
काही धाडायचंय
राहातं वाटत

पण कोणासाठी?
याचे उत्तर सापडेपर्यंत मौनच राखावे म्हणतो.

न जाणो आपणही त्याच पंक्तीचा एक वीर होऊन जाऊ ही भीतीही असतेच मनात

आणि ही शल्ये सोसण्याची,
सहन करण्याची पितामही पाठ कोठून आणावी हाही एक प्रश्न आहेच.

उत्तरायन-दक्षिणायन महत्त्वाचे नाही
'शरशय्या करून देणारा पार्थ तरी भेटायला हवा'
हीच खंत आहे

© *रमेश कुरलीकर*

No comments:

Post a Comment