*घायाळ हरणी*
अंधार गडद
काहूर दाटले
आक्रोश करून
डोळेही आटले
अधुऱ्या स्वप्नांची
गाठोडी रितीच
फाटकी ओंजळ
खुंटली गतीच
काजळी व्यापून
काळोखी आयुष्य
उजाड जिंदगी
गोठले भविष्य
गळ्यात हुंदका
ओठात गोठला
उद्याच्या चिंतेने
आक्रोश सरला
पिलांना पाहता
भयाण घरात
आणखी भरली
काळजी उरात
पिलांच्या डोळ्यांत
अपार कारूण्य
पाहून तिचेही
कोमेजे तारुण्य
कोसळे तडीता
आभाळ फाटले
धुक्याचे सावट
कपाळी दाटले
एकाकी झालीय
घायाळ हरणी
निष्पर्ण झाडांची
निष्प्राण धरणी
*© रमेश*
No comments:
Post a Comment