Monday, 29 April 2019

बट्टी

.           मुंबीतील IVGS ही शासकीय व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था शासनाच्या धोरणबदलामुळे बंद झाली. या प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेत असताना अनेक जिवाभावाचे मित्र भेटले. काही कामानिमित्त आसपास गेलो असता त्यांच्या मुक्काम स्थळांना (गावांना) भेट देत आलो. 
            परवा म्हणजे मुक्तसंवाद पुरस्कार कार्यक्रम आटोपून  इंदौरहून परतताना पूज्य साने गुरूजींच्या पवित्र कर्मभूमीस भेट देण्याचा योग निलेश भाऊंमुळे जुळून आला. गुरूजींची शाळा, छात्रालय, स्मृतीस्थळ या वास्तूंना डोळे भरून पाहता आले. साळुंखे परिवाराच्या पाहुणचाराने मन भरून आले. स्नेह, आपुलकी,जिव्हाळा अोसंडून वाहत होता.
           परिसरातील मंगळ मंदीर, प्रतिपंढरपूर, भैरवनाथ देवस्थान, संगमावरील कपिलेश्वराचे सुंदर प्राचीन मंदिर अशा अनेक तीर्थस्थळांना भेटी दिल्या; निलेश भाऊंची शाळा पाहिली. पण मनात घर करून राहिले ते त्या परिसरातील पाहुणचारात अग्रस्थान असणारे व सरांच्या घरी बनविलेले बट्टी नावाचे पक्वान्न.
           सौ.वहिनी व आईसाहेबांकडून पाकक्रियाही समजावून घेतली. भट्टी हा पदार्थ घरी जाऊन कधी बनवेन असे झाले. एकदा बनवलेही. मात्र गडबडीत फोटो घ्यायचे राहिले. आज पुन्हा एकदा तो पदार्थ बनविला. पण सरांच्या घरी बनविलेल्या लज्जतदार बट्टीचा स्वाद मात्र अजूनही जिभेवर रेंगाळतो आहे.
निलेशभाऊ, आई-बाबा, सौ.वहिनी सर्वांना नमस्कार, चिमुरडीला शुभाशिष !

No comments:

Post a Comment