Monday, 10 June 2019

विरक्त


मशागतीनंतर
रानात उठलेला ढेकूळ
हलक्‍या पावसाने
विरून जावा मातीत
तसा मीही विरून जावा
हयातभर कमावलेल्या शरीर,
मन, विचार आणि भावनांसह
कुठल्याच दगड-मातीवर
किंवा कागदावर 
नामोनिशानही न राहावे
उरलासुरला अहंकारही
सोबत जावा जळून
जसा कापूर स्वतःचेच अस्तित्व
पूर्णपणे टाकून
विरून जातो आसमंतात

                 *©रमेश*

No comments:

Post a Comment