Monday, 10 June 2019

तुझ्या हातातील

तुझ्या हातातील
ती भाकरी गोल-गोल,
गोड-गोड
त्रिकाळ भूक शमवणारी
निश्चितच आहे

तुझ्या हातातील
चिमूटभर मीठ
आपल्या सहजीवनात
नवरस नक्कीच
निर्माण करते

तुझ्या हातातले खुरपे
रानातले तण
साफ करत असते
आणि झाडू
घर-अंगण
साफ करतो
तसे मनामनांतली
जळमटे दूर करणारा
एखादा उपायही
आहे तुझ्याकडे
नक्कीच!

तुझ्या हातातले ते
जादुई अस्त्र
नको देऊस मला
पण सलणारे, खुपणारे,
टोचणारे, बोचणारे
काटे उचकटण्यासाठी
नक्कीच उपयोगी आहे
कधीतरी !

            *©रमेश*

No comments:

Post a Comment