Thursday, 19 September 2019

नाट्यछटा : इलेक्शन

रामराम मंडळी,
हो नमस्कार,नमस्कार!!
तर बाबुराव सांगायचा मुद्दा असा की, पक्ष कोणताही असो, उमेदवार कितीही असू देत, आमचा विजय ठरलेला आहे. अहो, बाबुराव का म्हणून काय विचारता ! आमचं लोकमत माहीत नाही का तुम्हाला ?
अहो चांद्यापासून बांद्या पर्यंत आणि कश्मिर पासून कन्याकुमारीपर्यंत आपला वट हाय.
कोणत्या बी हापीसात जावा आणि नुसतं नाव सांगा १००% काम झालं म्हणून समजा. ‌ कसं ?
नाय...नाय... नाय !
तसं काय समजू नका. अहो खासदारकीला आमच्या विरोधी उमेदवाराचं डिपाॅझीट जप्त झालं होतं!
अन् आता तर आमदार की हाय! किस झाड की पत्ती.
हे बबन्या लेका उगा फुशारकी मारू नगं. आपलं काम नव्हतं ते. म्हणं विरोधकांनी पैसे वाटले !
       पैसे वाटू देत,नाहीतर नोटा वाटू देत. तसलं काही जमायचं नाही. आमचा रुपाया बंदा हाय. आणि त्यो बी चांदीचा हाय. तवा गाशा गुंडाळा ह्मणावं.इरोधकास्नी.
आरं... रं... रं...ते बघा इलेक्षणच्या आधी आयाळ कापून सिंह गावात खायला लागल्यात.
म्हंजे काय ? कळलं नाही तुम्हाला ! कसं कळणार हो तुम्हाला. ज्याचा जेवढा मेदू तेवढीच त्याची कुवत. आमच्या दारात ट्यॅव...ट्यॅव... ट्यॅव... ट्यॅव.
लाल दिव्याची गाडी उभारली म्हणून समजा.
म्हणजे थेट मंत्रीपद असो मग काय मजाच मजा लाल दिव्याची गाडी दारात आली कि आज हे पाहण्याचं गाव उद्या ते पाहुण्याचं गाव कोणालाही चुकवणार नाही बाबुराव देवा ला जाणार नाही असं कसं होईल जाणार जरूर जाणार तिरुपतीच्या बालाजी ला जाणार पंढरपूरच्या विठोबा ला जाणार तुळजापूरच्या भवानी आईला जाणार अष्टविनायक दर्शन सुद्धा करणार आणि तेसुद्धा सहकुटुंब बाबुराव सरकारी पैशावर चिनी करायची नाही हो सरकारी पैशावर कसलीच आम्ही जनतेची सेवा करतो म्हणून आमच्या सेवेसाठी गाडी असणार आणि हे बघा आम्ही आमदार झाल्यावर आम्हाला आमदार फळ मिळणार की नाही त्याचा वापर करणार अहो तो पैसा लोकांचाच आहे म्हणूनच मी तो लोकांच्या कल्याणासाठी वापरणार आता लोक बाहेरचे काय नि खरच ए काय सगळे सारखेच की कुटुंबातली माणसं हेसुद्धा लोकच पहि पाहुणे हेसुद्धा लोकच मै यात कसला आलाय भ्रष्टाचार उत्तर शिष्टाचार आम्ही लोकांची सेवा करणार सरकार आमची सेवा करणार पीठ
बाबुराव प्रचाराची काळजी करू नका
लहान-म्हणू नका, थोर म्हणू नका. तरुण म्हणू नका, म्हातारा म्हणू नका. समद्यांची भरती आहे. ऐकलं का ? कोणा पक्षाच्या मदतीची आम्हाला गरज नाही. आम्ही आमच्या स्वबळावर निवडणूक लढवणार. हाय काय त्यात अहो एका वर्षाची ची गुळाची पट्टी कोटीच्या घरात येते. त्यातले पाच पंचवीस लाख खर्च झाले तर बिघडलं कुठे अजिबात काळजी करू नका गाडी मिळणार भत्ता मिळणार तुम्ही फक्त प्रचाराला तयार राहावा नाय नाय नाय नाय नाय तसा कोणाचा झेंडा आम्ही हाती धरणार नाही आमचा आपला स्वबळावर चा स्वतंत्र पक्ष याचा झेंडा घ्यावा तर त्याला राग येणार आणि त्याचा झेंडा घ्यावा तर याला राग येणार. म्हणून मी ठरवलं बघा सगळ्यास्नी हाताला धरून पुढे जायचं. आमचा आपला स्वतंत्र पक्ष. कोणाच्या अध्यात नको कोणाच्या मध्यात नको स्वतंत्र म्हणजे स्वतंत्र तर मग लागा कामाला.
भागातल्या सगळ्यात तरुण मंडळाच्या अध्यक्षांना बोलवा महिला बचत गटाच्या अध्यक्षांना बोलवा बालवाडीच्या बाईंना बोलवा ताईंना बोलवा आणि दाई नाही बोलवा प्राथमिक शाळेच्या गुरुजींना बोलवा हायस्कूलच्या सरांनी बोलवा जंगी पार्टी होऊ दे काय कमी पडू देऊ नका अहो तुम्ही आमचं कारभारी मग कशाला घाबरतात जाऊदे झाडून आणि येऊ दे निवडून बरा लागा कामाला तुमच्या सारखे कार्यकर्ते असल्यावर आम्हाला हो कशी काळजी आमचा विजय पक्का नुसता आमदार नाही मंत्री होणार आम्ही आवर्त घ्या पुढच्या गावात सभेला गेले पाहिजे नमस्कार येतो मंडळी.

No comments:

Post a Comment