Saturday, 31 August 2019

वाघिणीचे दूध

वाटेतल्या दगड-धोंड्याना
किती दिवस नावे ठेवायची
डोळे झाकून चालणारा
ठेचाळणारच
आम्ही ती लक्तरे
केव्हाच दिली फेकून
आणि सोडले
झूल समजून
कातडीचे रंग कुरवाळणे
सावलीत,भिक्षेवर,लाचारीने
किती दिवस जगायचे?
मन-मनगट-मेंदू
शाबूत असताना
कारण जगण्याचं संकट
अस्मानी नाही
आणि सुलतानीही
घाव घातल्याशिवाय
निर्जीव दगडही नाही फुटत
वारसाच जर सांगायचा
महामानवांचा तर...
प्रत्येक पिलाला
वाघिणीचे दूध पिऊन
गुरगुरायला सांगायलाच
हवे काय?
आणि नसेल हिंमत होत
तेव्हा जगलो काय!
अन् ... ... ...
सारखेच

               *© रमेश*

No comments:

Post a Comment