तसा
रोज उगवणारा सूर्य
नव्या दिवसाबरोबर
नवे वर्षच घेऊन येतो
नव्या वर्षाचे
स्वागत करताना
राहून राहून वाटते
आज एक दिवस-एक वर्ष
वजा झाले आयुष्यातून
हा जमाखर्च मांडावा
की न मांडावा
हा प्रश्नही ज्याचा त्याचा
पेला अर्धा भरला आहे
असं म्हणता येतं
आणि अर्धा सरला आहे
असंही म्हणता येतं
पूर्ण भरू दे पेला
अर्धा भरला आहे त्यांचा
आणि सरलेल्यांचाही
व्हाट्सअप मधला
मेसेज डिलीट करावा
तसं दुःख
डिलीट करता आला असतं
तरीही काही प्रश्न उरलेच असते
नुसतेच रंग फेकून
आयुष्याच्या कॅनव्हासवर साकारणार नाही सुंदर चित्र
अचूक ठिकाणी योग्य तितका रंग भरण्यासाठी हवी असणारी सृजनशक्ती सर्वांच्या आयुष्यात
येऊ दे उद्याच्या नव्या
वर्ष अथवा दिवसापासून
हेच पसायदान
*रमेश*
No comments:
Post a Comment