चिल्लर पार्टी चित्रपट चळवळीच्या वतीने गोविंद पानसरे (अण्णा) यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येत असलेल्या बैल या नाट्याविष्काराची जाहिरात पहिल्यापासूनच मनात एक उत्सुकता निर्माण झाली होती. कधी एकदा २४ तारीख उजाडते आणि आपण हा नाट्याविष्कार पाहतो असे झाले होते. काल ती तारीख उजाडली आणि शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे अविस्मरणीय नाट्याविष्कार संपन्न झाला. लोकरंगमंच,सातारा यांनी डोळ्यांचे पारणे फेडणारा आणि उत्सुक मनाची तहान-भूक शमविणारा काव्य, नाट्य, संगीत व नृत्य यासह सादर केला.
गतवर्षी राज्य नाट्य स्पर्धेत विभागातून प्रथम क्रमांकावर निवडलेल्या गेलेल्या या कार्यक्रमाने यशस्वीतेची किती उंची गाठली हे माझ्या आईच्या शब्दात, *"असं काय तरी बेस्ट बघायजोगं असल्यावर घिऊन ईत जा बाबा आमास्नी! टीव्हीला असला बघायजोगा कारेक्रम सोडून काय दावत्यात. एक बाई सतरा न्हवरं नायतर योक बाबा सतरा बायांच्या मागं लागतोय कुत्र्यासारखा.*
नाटकाला जायचं म्हंटल्यावर खरं तर "नाटकातलं आमास्नी काय कळतंय ! जावा तुमी सुना-नातवास्नी घेऊन." असं म्हणणारी आयुष्यभर शेताभातात राबून पंचाहत्तरी ओलांडलेली ती माऊली. याहून बोलकी अशी प्रतिक्रिया आम्ही आणखी काय द्यावी.
*कष्टकऱ्यांचा बाप* या अण्णांसाठी दिलेल्या संबोधनाला साजेसा कार्यक्रम कार्यक्रम त्यांच्या जयंतीदिनी आमच्यासाठी(समस्त चिल्लर पार्टी प्रेमी) दाखविल्याबद्दल *संयोजक टीम-ए-चिल्लर पार्टीस* वावरभर धन्यवाद !
Tuesday, 26 November 2019
*नेटक्या संयोजनातला सूत्रबद्ध नाट्याविष्कार बैल (अबोलबाला)*
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment