वाटा
गावागावांतल्या
रस्ते
शहराशहरांतले
आखिवरेखिव... ओबडधोबड...
वेडेवाकडे... सरळसोट
रस्ते अरुंद... अफाट...
निमुळते... विस्तीर्ण
रस्तेच हल्ली शोधात
स्वत:च्या अस्तित्वाच्या
रस्तेही एकमेकांकडे जाण्यासाठी असतात
ही व्याख्याच नव्याने समाविष्ट
करावी लागेल कोशात
वाटा वाट पाहतात
रस्ते काय पाहात असतील ?
आणि रस्ते हृदये जोडतात
की वाटा हृदये जोडतात ?
कसे कळेल ?
*© रमेश*
No comments:
Post a Comment