दाढी
दाढी माझा प्राण आहे
सारे दाढीवाले माझे बांधव आहेत
माझ्या दाढीवर माझे प्रेम आहे
माझ्या दाढीतल्या काळ्या-पांढऱ्या आणि वाकड्या-तिकड्या नटलेल्या केसांचा मला अभिमान आहे,
त्या केसांची स्वच्छता आणि निघा राखण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन,
मी माझ्या दाढीचा, काळ्या आणि पिकलेल्या कुरळ्या केसांचा मान ठेवीन आणि प्रत्येक केसाची निगा राखेन
माझी दाढी आणि माझे दाढीचे केस यांच्याशी स्वच्छ वागण्याचा मी प्रयत्न करेन
त्यांची स्वच्छता आणि त्यांची निगा ह्यातच माझे प्रेम सामावले आहे
कवित्व
Saturday, 26 December 2020
दाढी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment